Home ठळक बातम्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर

केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा पुढाकार


कल्याण दि.१४ ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा चांगलीच गोड होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पुढाकाराने केडीएमसी अधिकारी कर्मचऱ्यांना यंदा १६ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी बोनस देण्याबाबत आज संध्याकाळी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची बैठक संपन्न झाली. त्यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांशी बोनससंदर्भात फोनवर चर्चा केली. त्यानंतर आयुक्त डॉ. दांगडे यांनी हा सोळा हजार पाचशे रुपयांचा बोनस देण्याचे जाहीर केले.

यंदाच्या दिवाळीत पालिका कामगारांना 25 हजार रुपये बोसन दिला जावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. तर मागच्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस दिला गेला होता. त्यामध्ये १ हजार रुपयांची वाढ करत 16 हजार ५०० रुपये बोनस देण्याचे जाहीर करण्यात आले.

बोनसची रक्कम येत्या बुधवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली. तसेच नियमित, ठोकपगारी, कंत्राटी, परिवहन आणि शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार असून वर्ग एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांना मात्र बोनस दिला जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तर बोनस जाहीर होताच कामगारांनी आनंद व्यक्त करीत एकमेकांना पेढे भरविले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा