Home ठळक बातम्या ब्रिजकीशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड

ब्रिजकीशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड

 

कल्याण दि.28 ऑगस्ट :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारीची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात कल्याणातील ब्रिजकिशोर दत्त यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे. सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल कल्याण जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दत्त यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

लंडन विद्यापीठातून एमबीए केल्यानंतर ब्रिजकिशोर दत्त यांनी समाजकारणात प्रवेश केला आणि युवक काँग्रेसची निवडणूक जिंकत ते युवक काँग्रेसचे कल्याण लोकसभा अध्यक्ष झाले. त्यांच्या कामाची शैली, क्षमता आणि मनमिळाऊ स्वभाव पाहता काही वर्षांपूर्वी त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आपल्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुशिक्षित युवकांना काँग्रेसकडे वळण्यात महत्वाची भूमिका बजावली. ह्या कामाची पोचपावती म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांनी ब्रिजकिशोर दत्त यांच्यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला आपण पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया ब्रिज दत्त यांनी दिली आहे.

तर या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, उपाध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी आदींनी ब्रिज दत्त यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

मागील लेखविद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
पुढील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (30ऑगस्ट) 27 ठिकाणी लसीकरण ; दिव्यांगांना टोकनशिवाय लस

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा