Home क्राइम वॉच महावितरणकडून बल्याणी-कोन परिसरातील २३ वीज चोरांविरोधात गुन्हे दाखल; १८ लाख ५० हजारांची...

महावितरणकडून बल्याणी-कोन परिसरातील २३ वीज चोरांविरोधात गुन्हे दाखल; १८ लाख ५० हजारांची वीजचोरी उघड

 

कल्याण दि. १ ऑगस्ट :
वीज चोरांविरोधात महावितरणने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. टिटवाळा उपविभागातील बल्याणी आणि कोन परिसरात वीजचोरी करणाऱ्या तब्बल २३ जणांवर वीजचोरीचे गुन्हे महावितरणकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये १८ लाख ५० हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघड करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे.

वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार बल्याणी येथील १७ जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात तर कोन येथील ६ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात हे वीजचोरीचे गुन्हा दाखल झाले आहेत. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंते निलेश महाजन, अभिषेक कुमार आणि त्यांच्या टिमने ही कारवाई केली.

या सर्वांनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे महावितरणने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा