Home ठळक बातम्या निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्हं मिळाल्याबद्दल कल्याणातही शिवसैनिकांचा आनंदोत्सव

निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्हं मिळाल्याबद्दल कल्याणातही शिवसैनिकांचा आनंदोत्सव

कल्याण दि.11 ऑक्टोबर :

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्हं मिळाल्याबद्दल कल्याणातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एकत्र येत शिवसैनिकांनी मशाली पेटवून यावेळी जल्लोष करण्यात आला. (Celebration of Shiv Sainiks in Kalyan also for receiving torch symbols from Election Commission)

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला पक्षाचे नाव तसेच चिन्हं देण्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून काल रात्री घोषणा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांप्रमाणेच कल्याणातही शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केल्याचे दिसून आले. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी हातात पेटत्या मशाली घेऊन आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला गेला. शिवसेना फोडून जो काही अंधकार या राज्यात पसरवला आहे, तो अंधकार दूर करण्यासाठी आमच्या पक्षाला ही धगधगती मशाल हे चिन्ह मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा