Home ठळक बातम्या मानपाडा रोडवरील ग्रीन चौकातून पाटणकर चौक, चार रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत बदल

मानपाडा रोडवरील ग्रीन चौकातून पाटणकर चौक, चार रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत बदल

डोंबिवली दि.14 नोव्हेंबर :
डोंबिवली पूर्वेच्या मानपाडा रोडवरील ग्रीन चौकातून पाटणकर चौक, चार रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या रोडवरील साईनाथ प्रसाद ही अतिधोकादायक इमारत पाडण्याच्या कामासाठी हा वाहतूकीत बदल असणार आहे. इमारत पाडण्याच्या कामासाठी मंगळवारी 16 नोव्हेंबर आणि बुधवारी 17 नोव्हेंबरला सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा आणि पर्यायी पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 15 नोव्हेंबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 26 रुग्ण तर 15 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा