Home ठळक बातम्या ‘मी टू’ प्रकरणाच्या दोन्ही बाजू पोलिसांनी तपासणे गरजेचे – आदित्य ठाकरे

‘मी टू’ प्रकरणाच्या दोन्ही बाजू पोलिसांनी तपासणे गरजेचे – आदित्य ठाकरे

डोंबिवली दि.17 ऑक्टोबर :
सध्या देशातील सामाजिक वातावरण ढवळून काढलेल्या ‘मी टू’ मोहीमेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून घेण्याची गरज शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या ‘रासरंग’ गरबा उत्सवाला ते प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

आम्ही अक्षय कुमारसोबत सुरू केलेल्या सेल्फ डिफेन्स सेंटरमध्ये अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी येत असतात. मी टू प्रकरणी दोन बाजू असतात. कोणत्याही एका बाजूला जास्त ताकद मिळणे किंवा एखादी बाजू कमकुवत होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम या दोन्ही बाजू तपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

तर मुंबईत एसएनडीटीमध्ये विद्यार्थिनीसोबत झालेल्या प्रकारावर बोलताना ते म्हणाले की अशा प्रकरणातील आणि इतर ठिकाणी घडणाऱ्या अशा घटनांमध्ये संबंधित जबाबदार व्यक्तीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*