Home ठळक बातम्या विहीर दुर्घटनेतील पाचही जणांचा मृत्यू विषारी वायूमूळे झाल्याचा प्राथमिक अंदाज

विहीर दुर्घटनेतील पाचही जणांचा मृत्यू विषारी वायूमूळे झाल्याचा प्राथमिक अंदाज

कल्याण दि.2 नोव्हेंबर :
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात घडलेली दुर्घटना ही विहिरीतील विषारी वायूमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ही विहीर साफ करताना त्यातून हा वायू बाहेर पडला आणि ही भयंकर दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काल घडलेल्या या घटनेमध्ये तिघा नागरिकांबरोबरच अग्निशमन दलाच्या 2 जवानांचाही मृत्यू झाला. या घटनेमूळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनेला नेमके जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. तर या दुर्दैवी घटनेनंतर पाचही जणांचे रुख्मिणीबाई रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यानंतर विहिरीतील वायूमुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.डी. लवंगारे यांनी व्यक्त केला. तसेच या सर्वांचे व्हिसेरा आणि रक्ताचे नमुनेही राखून ठेवण्यात आले असून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन जवान प्रमोद वाघचौरे आणि अनंत शेलार यांच्यावर काल रात्री उशिराने अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अग्निशमन दलाकडून यावेळी मानवंदनाही देण्यात आली. तर गुणवंत गोस्वामी आणि राहुल गोस्वामी यांचे मृतदेह गुजरातला नेण्यात आले असून त्याठिकाणी तर खासगी सफाई करणारा इसम कमलेश यादव याच्यावर बिहारमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*