मुंबई | २५ सप्टेंबर :
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल 2 येथे दिनांक 23 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत Housekeeping Week मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Celebrates Housekeeping Week with Great Enthusiasm)
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात वेलकम सॉंग आणि गणपती डान्सने झाली. त्यानंतर Housekeeping टीममधील कर्मचाऱ्यांच्या उत्साहात भर घालण्यासाठी विविध मनोरंजक आणि सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये Chinese Whisper, चमचा-लिंबू आणि रस्सीखेच या स्पर्धांनी विशेष रंगत आणली.
कार्यक्रमात विमानतळावरील कर्मचारी तसेच सामाजिक जीवनाशी संबंधित विषयांवर आधारित नाट्य सादरीकरण करण्यात आले. या नाट्यप्रयोगातून कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील विविध पैलू प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच कविता बंडू अंधेरे यांनी केलेले सुंदर सादरीकरण उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले आणि कार्यक्रमाला भावनिक व सांस्कृतिक रंगत लाभली.
यानंतर मिक्स डान्स आणि संगीत खुर्ची यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण आणखी उत्साही केले. कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदाचे क्षण अनुभवले. या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा आणि कौतुकास्पद भाग म्हणजे वर्षभर प्रामाणिकपणे व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या Housekeeping कर्मचाऱ्यांचा गौरव. त्यांच्या मेहनतीची, समर्पणाची आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान म्हणजे त्यांच्या वर्षभराच्या परिश्रमाला मिळालेली कौतुकाची पावती ठरली.
या दोन दिवसीय उपक्रमात BVG, HiCare आणि Comepost या सर्व टीम्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध टीममधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत खेळ, कला, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकता, सहकार्य आणि टीमवर्कची भावना अधिक दृढ केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी आणि उत्साही सूत्रसंचालन विशाल कुंटे आणि किशोर माने यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली आणि प्रत्येक उपक्रम उत्साहाने पार पडला. Housekeeping Week 2026 हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता, वर्षभर विमानतळाची स्वच्छता, सुरक्षितता आणि उत्तम सेवा टिकवून ठेवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या प्रत्येक Housekeeping कर्मचाऱ्याच्या कार्याचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.
हा कार्यक्रम “स्वच्छता ही सेवा आहे, आणि ही सेवा देणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान हा आपला अभिमान आहे!” हा संदेश अधोरेखित करणारा ठरला.

