Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाचा निर्णय; भिवंडी-कल्याण- शीळ रस्ता रुंदीकरणास येणार वेग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाचा निर्णय; भिवंडी-कल्याण- शीळ रस्ता रुंदीकरणास येणार वेग

५६१ कोटी ८५ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित मान्यता

कल्याण – डोंबिवली दि.३ ऑगस्ट :
भिवंडी – कल्याण – शीळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे या कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे. या रुंदीकरणाच्या ५६१ कोटी ८५ लाख रुपयांच्या सुधारित कामांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. तसेच हा प्रकल्प शासनाच्या निधीतून ठेव अंशदान तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याचेही निश्चित करण्यात आले.

पत्रीपुल, काटई येथील २ रेल्वे उड्डाणपूल आणि विद्युत वाहिन्या तसेच जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याच्या कामांमुळे या सहा पदरीकरण कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने हा खर्च वाढला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास शासनाकडून देण्यात आलेला १०५ कोटीचा निधी वगळून उर्वरित ४५६ कोटी ८५ लाखांचा निधी हा शासनाच्या निधीतून महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येईल.

मागील लेखयेत्या शुक्रवारी कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार बंद
पुढील लेखगणेशोत्सवासाठी कोकणात दिव्याहून विशेष गाड्या सोडा – मनसे आमदार राजू पाटील

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा