Home कोरोना 45 वर्षांवरील नागरिकांचे उद्या (20 मे) कल्याण-डोंबिवलीत 17 ठिकाणी होणार लसीकरण

45 वर्षांवरील नागरिकांचे उद्या (20 मे) कल्याण-डोंबिवलीत 17 ठिकाणी होणार लसीकरण

2 ठिकाणी कोव्हॅक्सीन तर उर्वरित 15 ठिकाणी कोविशील्ड लस दिली जाणार

कल्याण-डोंबिवली दि.19 मे :
कल्याण डोंबिवलीत उद्या 20 मे रोजी 17 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून त्यापैकी 2 ठिकाणी कोव्हॅक्सीन तर उर्वरित 15 ठिकाणी कोविशील्ड लस दिली जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने हे लसीकरण होणार असून त्यापूर्वी टोकन घेणे आवश्यक असणार आहे. (Citizens above 45 years of age will be vaccinated tomorrow (May 20) at 17 places in Kalyan-Dombivali)

उद्या प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) या 2 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सीन लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हे।लसीकरण केलं जाणार असून कोव्हॅक्सीन लसीचा 2रा डोस 1ल्या डोसनंतर 28 दिवस पूर्ण झाल्यावर घ्यायचा असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.
तर ही 2 केंद्र सोडून उर्वरित 15 लसीकरण केंद्रांवर उद्या कोविशिल्ड लसीची 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार आहे. याठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड लसीचा 1ला डोस घेतल्यानंतर 2रा डोस देण्याचा कालावधी 6 ते 8 आठवड्यावरून 12 ते 16 आठवडे करण्यात आला आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा 1ला डोस घेऊन 84 दिवस झाले असतील अशा नागरिकांनाचा कोव्हिशिल्ड लसीचा 2रा डोस मिळणार आहे. हा कालावधी पूर्ण झाला नसल्यास लस मिळणार नसून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा