Home ठळक बातम्या केडीएमसीच्या ‘एकता दौड’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केडीएमसीच्या ‘एकता दौड’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

कल्याण दि.३१ ऑक्टोबर :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि आजच्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे युनिटी रनचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयापासून सुरू झालेल्या या एकता दौडला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

ही दौड कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय – अत्रे रंगमंदिर – महात्मा गांधी चौक- दुधनाका- पारनाका- लोकमान्य टिळक चौक- शंकरराव चौक मार्गे महापालिका मुख्यालयात समाप्त झाली. या एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना यावेळी एकता दिनानिमित्त शपथही देण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, परिमंडळ-1 चे उपआयुक्त धैर्यशील जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, प्रशांत भागवत, योगेंद्र राठोड, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, महापालिका शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती – जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, कल्याण रोटरी क्लबचे सदस्य, बिर्ला महाविद्यालय नाईट कॉलेजचे प्राचार्य हरिश दुबे, संदेश जायभाये त्याप्रमाणे बिर्ला महाविदयालयाचे एनएसएस, एनसीसी‍चे कॅडेट्स तसेच इतर विदयार्थी, कल्याण रनर्स ग्रुपचे सदस्य, ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या भगिनी तसेच नागरिकानी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

मागील लेखबुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांच्या मोबदल्यात घोटाळा झाल्याचा मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप
पुढील लेखध्येयवेड्या डोंबिवलीकर धावपटूची विश्वविक्रमाला गवसणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा