Home Uncategorised अनोख्या तंदूर चहाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अनोख्या तंदूर चहाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.29 डिसेंबर :

काही महिन्यांपूर्वी कल्याणात सुरू झालेल्या तंदूर चहाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. दररोज तब्बल 600 पेक्षा अधिक कप चहाची या ठिकाणी विक्री होत असून त्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती कल्याणात पहिला तंदूर चहा आणणाऱ्या धिरज असोदेकर आणि रोहन गोरेगावकर या युवकांनी दिली.

तंदूर चहाची मूळ संकल्पना पुण्याचा अमोल राजदेव आणि प्रमोद बनकर या दोघा तरुणांची. मात्र अल्पावधीतच ही हटके संकल्पना सुपरहिट ठरली. मग हळूहळू पुण्यातून या चहाने आता महाराष्ट्रात इतरत्र बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. नेहमीच काही तरी नविन करण्याची उर्मी बाळगणाऱ्या आजच्या युवापिढीला या तंदूर चहाची भुरळ पडली नसती तर नवलच.

कल्याणातील धीरज आणि रोहन हे दोघेही नोकरी न करता काहीतरी वेगळा व्यावसाय करण्याच्या विचारात होते. त्यात त्यांना तंदूर चहाचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्यांचा विचार पक्का झाला. बरोबर दोन महिन्यांपूर्वी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांनी तंदूर चहाची कल्याणातील पहिली फ्रँचाईजी सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत या तंदूर चहाला लोकांची मोठी पसंती मिळत असून कल्याणबरोबरच आसपासच्या शहर आणि ग्रामीण भागातूनही लोकं या चहाची चव घेण्यासाठी येत आहेत. धिरज आणि रोहनच्या या वेगळया वाटेवरील प्रवासाला टिम एलएनएनकडून भरपूर शुभेच्छा…

आपणही आपल्या बिजनेसच्या हटके संकल्पना आणि त्याची माहिती आम्हाला कळवू शकता. ज्याला आम्ही ‘एलएनएन’द्वारे हजारो लोकांपर्यंत पोहोचवू.

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9920231571/ 9323208533

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*