Home क्राइम वॉच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण झोनमध्ये पोलीसांची नाकाबंदी- कोंबिंग ऑपरेशन; अनेक गुन्हेगार ताब्यात

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण झोनमध्ये पोलीसांची नाकाबंदी- कोंबिंग ऑपरेशन; अनेक गुन्हेगार ताब्यात

 

कल्याण दि.13 एप्रिल 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात पुन्हा एकदा पोलिसांकडून नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. कल्याण परिमंडळात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून त्यात पाहिजे असणारे आरोपी पकडण्यासह साडेतीन लाखांची रोकडही भरारी पथकाने जप्त केली आहे.

विशेष म्हणजे कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, कल्याणचे एसीपी सुनिल पोवार यांच्यासह 14 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, 215 कर्मचारी, 1 एसरपीएफ प्लॅटून असे तब्बल 250 हुन अधिक अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते. यावेळी संशयास्पद गाड्यांची तपासणी करण्यासह, 7 पाहिजे असणारे आरोपी, 126 अवैध रिक्षाचालकांवर ही जंबो कारवाई करण्यात आली. तर यापूर्वीच करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत अनेक गुंडांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अनेकांना हद्दपारही केले आहे.

दरम्यान अवघ्या आठवड्याच्या आत कल्याणात पोलिसांनी दुसऱ्यांदा केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

 

अशी आहे आजची कारवाई….

1) भारतीय हत्यार कायदा 4/25 कारवाई- 03

2) भादंवि 294 प्रमाणे गुन्हा दाखल करून कल्याण स्टेशन परिसरात उभ्या राहणाय्रा- 16 वारांगना वर कारवाई केली.

3)पाहिजे असलेले आरोपी पकडले – 07

4) अवैध/ विनापरवाना रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई-126

5) हिस्ट्रीशिटर चेक केले- 46

6)महाराष्ट्र पोलिस कायदा 37(1), 135 प्रमाणे कारवाई- 1

7) सीआरपीसी 151(1) प्रमाणे कारवाई- 43

8) दारूबंदी कायद्या नुसार कारवाई- 04

9) 110/117 नुसार कारवाई- 3

10) 102/117 नुसार कारवाई-18

11) आंबिवली परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करून एक पाहिजे असलेली आरोपी अवैध शस्त्र बाळगताना अढळुण आल्याने त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम-4,25 प्रमाणे कारवाई केली

12) अनधिकृत फेरीवाले, चायनीज गाडी, हॉटेल आस्थापाना यांचेवर BP ACT प्रमाणे = 38 केसेस

13) ड्रंक अँड ड्राइव्ह =1 केस

14) नाकाबंदी दरम्यान लहान मोठी दुचाकी चार चाकी 323 वाहने चेक केली त्यापैकी 4 वाहनांवर मो.वा.का. प्रमाणे केसेस करण्यात आले.

15) भरारी पथक क्रमांक 4 यांचे सह कार्यवाहीत वाहने चेक केली, कारवाई दरम्यान 3,49,250/- रु वाहनातून जप्त करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*