Home ठळक बातम्या प्रलंबित आकृतीबंध मंजूर; कामगार संघटनेतर्फे आयुक्तांचा सत्कार

प्रलंबित आकृतीबंध मंजूर; कामगार संघटनेतर्फे आयुक्तांचा सत्कार

 

कल्याण दि.3 जून :
गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असणारा कल्याण डोंबिवली महापालिकेतील आकृतीबंधाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्याबद्दल म्युनिसिपल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांच्यातर्फे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या निर्णयामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 6 हजार 500 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

प्रलंबित आकृतीबंध मंजूर झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह वेतनवाढीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यामूळे हा आकृतीबंध मंजूर झाल्याची माहिती कामगार संघटनेचे नेते रवी पाटील यांनी दिली. तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत अधिकारी- कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्याध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष सुनील पवार, नेमाडे, भुजबळ, सुहास पवार, मिलिंद गायकवाड, हिरा कोर्दिया, हेमराज परमार, संजय भालेराव आणि भानुदास गरुड उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा