Home ठळक बातम्या पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढी विरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढी विरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन

 

कल्याण दि.10 जुलै :
सातत्याने इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत असून यामुळे सर्वसामन्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनांच्या किमतीविरोधात कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी सहजानंद चौक येथे केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

संपूर्ण देशभरात इंधन, घरगुती गॅस सिलेंडर, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे तेल तसेच सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सातत्याने इंधन दरवाढ होत असून सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करून देशातील सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. देशातील नागरिकांवर कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामध्ये बहुतांश लोकांनी स्वतःचे रोजगार, नोकऱ्या गमावल्या आहेत. बहुतांश कुटुंबाचे प्रमुख मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले असून देशातील गरीब आणि सामान्य नागरिक आत्महत्या करतील आणि त्यासाठी पूर्णपणे केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष विमल ठक्कर, मुन्ना तिवारी,अलसंख्यांक सेलचे शकील खान आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 103 रुग्ण तर 78 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 114 रुग्ण तर 128 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा