Home ठळक बातम्या सेना-भाजपचा आतून कीर्तन बाहेरून तमाशा सुरू आहे – अशोक चव्हाण

सेना-भाजपचा आतून कीर्तन बाहेरून तमाशा सुरू आहे – अशोक चव्हाण

कल्याण दि.24 जानेवारी :
भाजप- शिवसेनेचा आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा असा खेळ सुरू असल्याची टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कल्याणात केली. सारकरविरोधात राज्यात सुरू असणारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज कल्याणात आली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मैदानात झालेल्या जाहीर सभेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकार, भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि माजी मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी काँग्रेस पक्षात केलेला प्रवेश आणि स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सर्वांसमोरच झालेले वाद ही आजच्या सभेची ठळक घटना म्हणावी लागेल.

आपला लढा खऱ्या अर्थाने केंद्रातील भाजप शिवसेना सरकारशी लढा आहे. समाजातील सर्व जण या सरकारला कंटाळली आहेत. आता निवडणुका आल्याने पुन्हा चुनावी जमले जोरात सुरू झाले आहेत.15 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या, कल्याण डोंबिवलीसाठी घोषणा केलेले साडेसहा हजार कोटी कुठे गेले? असे विचारत शिवसेना – भाजपचा लोकांना खोटं बोलून बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा असा खेळ सुरू असल्याचा घणाघात चव्हाण यांनी यावेळी केला.

तर 2 कोटी तरुणांना रोजगार, मेक इन इंडिया अशा अनेक घोषणा सरकारने दिल्या मात्र हे सर्व फेक इन इंडिया असल्याची टिका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू असून लोकांवर खोट्या केसेस दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कल्याण डोंबिवली या दोन्हीं शहारातील गुंडगिरी वाढत आहे. धनंजय कुलकर्णीकडे 170 शस्त्र सापडली, सनातन संस्था धुमाकूळ घालत असून या लबाड सरकारला घालवायची वेळ आल्याचा हल्लाबोलही विखे पाटील यांनी यावेळी केला.

यावेळी झालेल्या सभेला प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ब्रिज दत्त, वरिष्ठ नेत्या अलका आवळसकर, प्रकाश मुथा, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, विमल ठक्कर, मुन्ना तिवारी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*