Home ठळक बातम्या राज्यातील वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 20 फेब्रुवारीपासून पुणे ते मंत्रालय पैदल ‘संघर्ष मोर्चा’

राज्यातील वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 20 फेब्रुवारीपासून पुणे ते मंत्रालय पैदल ‘संघर्ष मोर्चा’

कल्याण दि.13 फेब्रुवारी :
सेवेमध्ये समाविष्ट करून घेणे,किमान वेतन मिळण्यासह इतर प्रमूख मागण्यांसाठी वीज कंत्राटी कर्मचारी पुणे ते मंत्रालय असा पैदल संघर्ष मोर्चा काढणार आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, खासदार आणि आमदारांना निवेदन देण्यात आले आहे.

राज्याच्या वीज क्षेत्रातील महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण विभागात गेल्या अनेक वर्षात जेवढ्या कायमस्वरूपी कामगारांची गरज आहे तेवढी नोकरभरती अद्याप झालेली नाही. त्यामुळे कामगारांची गरज आणि प्रत्यक्ष नेमलेल्या कामगारांच्या संख्येत प्रचंड तफावत असून हजारो पदे रिक्त असल्याचे वीज कंत्राटी कामगार संघातर्फे सांगण्यात आले. तसेच कंत्राटी कामगारांना सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबतच रानडे समितीचा अहवाल सकारात्मक असूनही कंत्राटी पद्धतीने कामगार प्रथा चालू आहे. या कामगारांना प्रत्यक्षात किमान वेतनही मिळत नसल्याची माहितीही कामगार संघातर्फे देण्यात आली. या मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी 20 फेब्रुवारीला पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयापासून या संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार असून 26 फेब्रुवारीला हा मोर्चा मुंबईतील मंत्रालयावर धडक आहे.

दरम्यान कल्याणातील वीज कंत्राटी कामगार संघाचे कल्याण परिमंडळ अध्यक्ष मनोज मनुचारी आणि सचिव योगेश बनसोडे यांनी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यावर येत्या 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यात याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*