Home कोरोना कल्याण डोंबिवलीसाठी कोरोना लस दाखल; डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

कल्याण डोंबिवलीसाठी कोरोना लस दाखल; डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

 

कल्याण/ डोंबिवली दि.13 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीसाठी कोरोनाची लस आज संध्याकाळी दाखल झाली असून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी टाळ्यांच्या गजरात या लसीचे स्वागत केलेले पाहायला मिळाले. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्ह्यासाठी लसीचा पहिला साठा दाखल झाला होता. त्यापैकी कोवीशिल्डच्या 6 हजार डोसचा पहिला साठा कल्याण डोंबिवलीला आज प्राप्त झाला.

विशेष म्हणजे 13 मार्चला कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. आज बरोबर 10 महिन्यांनी आणि 13 तारखेलाच ही लस कल्याण डोंबिवलीत दाखल झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्यसेवक आणि फ्रंट लाईन वर्करला या लसीचे डोस दिले जाणार आहेत. 16 तारखेपासून या लसीकरणाला सुरुवात होणार असून कल्याणात रुख्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पूर्वेत शक्ती धाम कॉरंटाईन सेंटर तर डोंबिवलीमध्ये डीएनसी शाळा आणि शास्त्रीनगर रुग्णालयात हे लसीकरण केले जाणार आहे. दररोज 100 हेल्थ वर्कर्सला ही।लस दिली जाणार असल्याची।माहिती केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा