Home क्राइम वॉच लाचखोर संजय घरतच्या पोलिस कोठडीत पुन्हा 2 दिवसांची वाढ

लाचखोर संजय घरतच्या पोलिस कोठडीत पुन्हा 2 दिवसांची वाढ

कल्याण दि.17 जून :
8 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्या पोलीस कोठडीत आणखीन 2 दिवसांची वाढ करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश एन एम वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तपास अधिका-यांकडून तपासकामात घरत सहकार्य करीत नसल्याचा मुद्दा पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ती न्यायाधीश वाघमारे यांच्याकडून मान्य करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*