Home क्राइम वॉच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील गावठी दारुचे अवैध साठे उध्वस्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील गावठी दारुचे अवैध साठे उध्वस्त

ठाणे दि. 27 मार्च:
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाई करत तीन लाख रुपयांचे अवैध मद्यसाठे आणि ते बनविण्यासाठी लागणारी सामुग्री जप्त करुन नष्ट केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कल्याण तालुक्यातील हेदुटणे गावाच्या नदीकिनारी छापा टाकून दोन ठिकाणी कार्यवाही केली. त्यात 6 हजार 600 लिटर रसायन, लोखंडी बॉयलर ढोल, रसायनाने भरलेले 33 प्लास्टिक ड्रम असा एकूण १ लाख ४८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर तसेच उपअधिक्षक कल्याण यांनी व अंबरनाथ पोलीसांच्या साहाय्याने चिंचपाडा आणि मनेरा गावात छापे मारुन गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्थ केले. या कारवाईत 5 हजार 500 लिटर रसायन, दोन ड्रम, प्लास्टिक टाक्या असे सुमारे 1 लाख 51 हजार 100 रुपयांचे साहित्य जप्त केले.

*#LoksabhaElection2019*

*#LocalNewsNetwork.in*
*#LNN*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*