कल्याण दि.9 मार्च :
म्हाडाच्या महिला कर्मचाऱ्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी कल्याण कोर्टात दाखल मानहानी खटल्यामध्ये माजी आमदार राजू पाटील यांनी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. (Court Orders Former MLA Raju Patil to Appear in Defamation Case Filed by MHADA Employee)
म्हाडाच्या डोंबिवलीजवळील खोणी येथे सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात म्हाडा कर्मचारी छाया राठोड यांच्या 7 नातेवाईकांना लॉटरी लागल्याचा आरोप तत्कालीन आमदार राजू पाटील यांनी मार्च 2021 मध्ये केला होता. त्याप्रकरणी छाया राठोड यांनी कल्याण कोर्टामध्ये माजी आमदार राजू पाटील यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला असून ॲड. प्रदीप झेंडे आणि ॲड. निखिल वाडीकर (मुंबई उच्च न्यायालय) हे अर्जदार छाया राजेश राठोड यांच्या वतीने काम पाहत आहेत. या मानहानीच्या खटल्याची नुकतीच सुनावणी झाली असून 20 जून 2026 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला माजी आमदार राजू पाटील यांनी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

