Home कोरोना नविन शासकीय आदेश येईपर्यंत केडीएमसी क्षेत्रात कोवीड लेव्हल 3 चेच निर्बंध कायम

नविन शासकीय आदेश येईपर्यंत केडीएमसी क्षेत्रात कोवीड लेव्हल 3 चेच निर्बंध कायम

 

कल्याण – डोंबिवली दि.2 ऑगस्ट :
राज्यातील काही जिल्ह्यांत कोवीडचे निर्बंध शिथिल करण्याची शिफारस टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे. त्यामूळे व्यापारी वर्गासह सर्व नागरिकांचे लक्ष राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले असले तरी अद्याप मात्र त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने नविन आदेश जारी करत पुढील शासकीय आदेश येईपर्यंत केडीएमसी क्षेत्रात कोवीड लेव्हल 3 चेच निर्बंध कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत कोवीडचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यामूळे या जिल्ह्यातील कोवीड निर्बंध शिथिल करण्याची शिफारस कोवीड टास्क फोर्सने राज्य सरकारकडे गेल्या आठवड्यात केली आहे. या शिफारशीमध्ये इतर जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्याचाही समावेश असल्याने राज्य सरकार आता काय निर्णय घेते याकडे व्यापारी, दुकानदार यांच्यासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील या आठवड्याचे कोवीड निर्बंध आज सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजेच 2 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू होते. परंतू केडीएमसी प्रशासनाने गेल्या शुक्रवारी याबाबतचा नविन आदेश जारी करत आता शासकीय स्तरावर पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामूळे निर्बंध शिथिल होण्यासाठी व्यापारी वर्गासह नागरिकांना आणखी काळ वाट पाहावी लागणार असे सद्यस्थितीवरून दिसत आहे.

सध्या आम्ही कोवीड लेव्हल 3चेच निर्बंध कायम केले आहेत. हे कोवीड निर्बंध शिथिल करण्याबाबत शासकीय स्तरावर आम्हाला कोणताही आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

मागील लेखडोंबिवली वाहतूक पोलिसांचाही पूरग्रस्तांना मदतीचा हात
पुढील लेखबिर्ला कॉलेज शिवसेना शाखा आणि रवी पाटील फाऊंडेशनतर्फेही कोकणातील पूरग्रस्तांना मदत

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा