कल्याण डोंबिवलीतही 60 वर्षांवरील नागरिकांचे कोवीड लसीकरण सुरू

    कल्याण/ डोंबिवली दि. 1 मार्च :
    कल्याण डोंबिवली महापालिका(kalyan dombivli municipal corporation, kdmc) क्षेत्रातील 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वय वर्ष 45 ते 59 वयोगटातील गंभीर व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोविड-19 (covid 19) (covid 19 vaccination for senior citizens) चे लसीकरणाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या कल्याणातील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्येही आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत.

    लसीकरण केंद्रावर होणारा विलंब टाळण्यासाठी या वयोगटातील नागरिकांनी शासनाच्या cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करतांना 60 वर्ष वयावरील नागरिकांनी त्यांचे वयासंबंधीचे शासकीय ओळखपत्र अपलोड करणे तर वर्ष 45 ते 59 या वयोगटातील व्यक्तींनी केंद्र शासनाने प्रमाणित केलेल्या गंभीर व्याधींबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक असेल. यामुळे नागरिकांना लसीकरणाकरीता त्यांचे सोयीचे आणि नजीकच्या केंद्राची निवड करणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत लस मोफत मिळणार असून खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी 250/- रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

    त्यामूळे महापालिका क्षेत्रातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच 45 ते 59 या वयोगटातील गंभीर व्याधी असलेल्या सर्व नागरिकांनी cowin.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळावी आणि महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी महापालिकेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

    She was completely baffled For the moment it seemed as if the attack were about to be directed against his body, and his brain thus was on the alert, but without Eli Lilly Australia Pty Ltd Cialis donde se vende viagra sin receta understanding. cialis price in south africa She entered with delight into an atmosphere in which private matters were being interchanged freely, almost in monosyllables, by the older women who now accepted her as one of themselves.

    १ कॉमेंट

    तुमची प्रतिक्रिया लिहा

    तुमची कंमेंट लिहा
    तुमचे नाव लिहा