Home कोरोना पुढील 3 दिवस केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये होणार कोवीड लसीकरण

पुढील 3 दिवस केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये होणार कोवीड लसीकरण

7 नोव्हेंबरला केडीएमसीचे लसीकरण राहणार बंद

कल्याण – डोंबिवली दि.3 नोव्हेंबर :
उद्यापासून (4 नोव्हेंबर) पुढील 3 दिवस (6 नोव्हेंबरपर्यंत) केडीएमसीच्या महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोवीड लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे. या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर 6 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या मर्यादित कालावधीत कोवीड लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली. त्यामूळे कोविड लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व नागरिकांनी पुढील 3 दिवस आपल्या घरानजीक असणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाच्या पहिल्या/दुसऱ्या मात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन केडीएमसीच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

तर येत्या रविवारी 7 नोव्हेंबर 2021 रोजी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा बंद राहणार असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 36 रुग्ण तर 37 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा; जागेच्या आरक्षणाचा तांत्रिक मुद्दा अखेर निकाली

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा