Home ठळक बातम्या स्वतंत्र गीताप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचा स्वतंत्र ध्वजही तयार करा – मनसे आमदार राजू पाटील

स्वतंत्र गीताप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचा स्वतंत्र ध्वजही तयार करा – मनसे आमदार राजू पाटील

कल्याण ग्रामीण दि.३ फेब्रुवारी :

स्थापनेच्या तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला स्वतःचे अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राच्या या अधिकृत गाण्याप्रमाणेच राज्याचा अधिकृत ध्वजही तयार करण्याची मागणी मनसेचे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Create independent flag of Maharashtra state like independent song – MNS MLA Raju Patil)

महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल असा ठराव राज्य शासनाने नुकताच केला आहे. त्यामुळे राज्याला अधिकृत गीत मिळाले असून आता राज्याचा अधिकृत ध्वज असणेही तितकेच गरजेचं असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. आता आपल्या राज्याची स्वतःची अशी ओळख असावी यासाठी देशातील काही राज्यांप्रमाणे अखंड आणि संयुक्त महाराष्ट्राचा ध्वजही असला पाहिजे अशी आग्रही भूमिका आमदार प्रमोद पाटील यांनी घेतली आहे. यासाठी आगामी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्य ध्वजाबाबतचा निर्णय घेण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

१ कॉमेंट

Leave a Reply to Gopal Pillai प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा