Home ठळक बातम्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं उघडली; कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी देवीसह इतर मंदिरात भाविकांची गर्दी

घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं उघडली; कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी देवीसह इतर मंदिरात भाविकांची गर्दी

 

कल्याण दि.7 ऑक्टोबर :
कोरोनामुळे बंद झालेली मंदिरं घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून पुन्हा एकदा भाविकांसाठी खुली झाली. त्यामूळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामूळे कल्याणच्या ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीच्या मंदिरात आणि टिळक चौकातील महालक्ष्मी मंदिरात भक्तांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे ऐतिहासिक मंदिर असून कल्याणच्या सुवर्ण ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. नवरात्रीच्या काळात याठिकाणी मोठी जत्रा भरलेली असते. मात्र कोरोनामुळे यंदा गर्दी होणाऱ्या गोष्टी टाळण्यात आल्या आहेत. तर कल्याण पश्चिमेच्या जुन्या मंदिरांपैकी एक असणाऱ्या टिळक चौकातील महालक्ष्मी मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवीला अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यासोबतच सोशल डिस्टन्स, सॅनिटायजर आणि मास्क अशा कोवीड प्रतिबंधक उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याचे महालक्ष्मी आणि दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात दिसून आले.

तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिरही दर्शनासाठी खुलं झाल्यामुळे भक्तांनीही आनंद व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा