Home ठळक बातम्या नविन पत्रीपुल अर्थातच तिसाई देवी उड्डाणपुलावर सेल्फीसाठी लोकांची गर्दी

नविन पत्रीपुल अर्थातच तिसाई देवी उड्डाणपुलावर सेल्फीसाठी लोकांची गर्दी

कल्याण दि.25 जानेवारी :
कल्याणच्या बहुचर्चित पत्रीपुलाचे आज मोठ्या दिमाखात लोकार्पण झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुलावर तिरंग्याच्या रंगाची अत्यंत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
कल्याण डोंबिवलीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आई तिसाईदेवी उड्डाणपूल अर्थातच नविन पत्रीपुलाचे आज मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण करण्यात आले. हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्यानंतर लोकांनी आनंद व्यक्त करण्यासह सुटकेचा निश्वास सोडला आहे. वाहतूक कोंडी आणि त्यामुळे झालेला मानसिक त्रास आज संपुष्टात आला.

परिणामी लोकांनी या पुलावरून प्रवास करतानाच या पहिल्या प्रवासाची आनंदी आठवण जपून ठेवण्यासाठी सेल्फी घेतली नसती तर नवलच. तरुण वर्गासह महिला आणि अनेक जण पुलावर थांबून सेल्फी घेत होते. तर अनेक जण आपापल्या गाड्यांतून या पुलाची छबी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा