गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची केली मागणी
कल्याण दि.24 ऑगस्ट :
बदलापूर येथे दोन चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज कल्याणातही निषेध आंदोलन केले तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन यावेळी निषेध करण्यात आला. त्यासोबत हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी ही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने आपला आजचा प्रस्तावित महाराष्ट्र बंद मागे घेत त्याऐवजी ठिकठिकाणी निदर्शने करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानुसार आज कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी मधील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. या आंदोलनकर्त्यांनी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्या ठिकाणी आपले निषेध आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे, बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कोठारात कठोर शासन झालं पाहिजे आधी अशाच्या मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या.
दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते