Home ठळक बातम्या शिवप्रेमींकडून कल्याणातही राज्यपालांविरोधात निदर्शने

शिवप्रेमींकडून कल्याणातही राज्यपालांविरोधात निदर्शने

कल्याण दि.२० नोव्हेंबर :

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर शिवप्रेमींकडून तीव्र निषेध केला जात आहे. राज्यभराप्रमाणे शिवप्रेमींनी कल्याणातही जोरदार निदर्शने केल्याचे दिसून आले.

नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केले ज्याच्यावर शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कल्याण पश्चिमेच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शिवप्रेमींनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच यावेळी कोश्यारी यांच्या निषेधाचे पोस्टर हातात घेऊन भगतसिंग कोश्यारी चले जाओ, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारे वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल या राज्यात नको, त्यांना पुन्हा त्यांच्या राज्यात माघारी पाठवण्याची मागणीही यावेळी शिवप्रेमींनी केली.

 

 

मागील लेखकल्याण डोंबिवलीतील हिरकणींची पहिली सायकल स्पर्धा दिमाखात संपन्न
पुढील लेखकल्याण डोंबिवलीचा पारा आला १२ अंशांवर ; दहा वर्षांतील निच्चांकी तापमानाची नोंद

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा