Home ठळक बातम्या कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही मराठा समाजाची निदर्शने

कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही मराठा समाजाची निदर्शने

डोंबिवली दि .6 सप्टेंबर:

जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या घटनेनंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. या घटनेचे पडसाद दररोज राज्याच्या विविध भागांत उमटत असून कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही सकल मराठा समाजातर्फे निदर्शने करण्यात आली. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

डोंबिवली पूर्वेतील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथील इंदिरा गांधी चौकात सकल मराठा समाजातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजातर्फे बहुजन समाज बांधवांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. मात्र सरकारने आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे आणि मराठा समाज बांधवांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी मराठा  करण्यात आली आहे.

मागील लेखकल्याणमध्ये गोविंदा पथकांना सुरक्षा विमा प्रमाणपत्र वाटप
पुढील लेखदहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या वाहतुकीत बदल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा