Home Uncategorised देशपांडे कॅटरर्स टुरिझमचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

देशपांडे कॅटरर्स टुरिझमचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

कल्याण दि.26 ऑक्टोबर :

कल्याणसह मुंबई नाशिक आदी भागात प्रसिद्ध असलेल्या नामांकित देशपांडे कॅटरर्सचा २१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात हा दिमाखदार सोहळा पार पडला. या विशेष सोहळ्याचे आयोजन देशपांडे कॅटरर्सचे सर्वेसर्वा संतोष देशपांडे ,कविता देशपांडे आणि समीर देशपांडे यांनी केले होते.

या भव्यदिव्य सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली ती अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांची. या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते ते म्हणजे हास्य कलाकारांनी सादर केलेला अभिनय. हास्य कलाकार अंशुमन विचारे, नम्रता आवटे, अभिजित चव्हाण, आशीष पवार यांनी आपल्या अभिनयातून उपस्थित कल्याणकरांना त्यांनी चांगलेच हसवले.

देशपांडे कॅटरर्स आणि टुरिझम हे गेल्या २१ वर्षांपासून नागरिकांना सेवा देत असून आपल्या चांगल्या सेवेमुळे नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. विवाह सोहळा, वाढदिवस, साखरपुडा, वार्षिक महोत्सव, संगीत, मेहंदी, कॉर्पोरेट इव्हेंट, रिसेप्शन पार्टी, सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन देशपांडे कॅटरर्सच्या माध्यमातून करण्यात येते. तर देशपांडे टुरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच देवस्थाने, पर्यटनस्थळं, भारतातील काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वच पर्यटनस्थळं, तसेच भारताबाहेरील बँकॉक पट्टाया, सिंगापूर, दुबई, बाली, मलेशिया आदी टूरचे आयोजन करण्यात येते. गेल्या २१ वर्षात देशपांडे कॅटरर्स आणि टुरिझमच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. त्यांच्या या चांगल्या आनुभवामुळेच या वर्धापनदिन सोहळ्याला ५ हजारहून अधिक नागरिक उपस्थित होते.

या भव्य दिव्य सोहळ्याचे अतिशय चांगले आयोजन केल्याबद्दल कल्याणकर नागरिकांनी देशपांडे परिवाराचे कौतुक केले. या सोहळ्याला कल्याणसह आस पासच्या शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्टीत व्यक्ती, सामन्य नागरिक यांनी उपस्थिती दर्शवली. नाशिक कार्यालयाचे दिनेश आमोणकर, विजय पोरजे, गणेश उगले, मुंबई कार्यालयातील सुजन पाटील आणि मनीषा पाटील यांनी देखील देशपांडे यांना सहकार्य केले. यामध्ये कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, पोलीस उपायुक्त संजय शिंदे आदींचा समावेश होता. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही संपूर्ण ट्रॅव्हल्स पाटनर यांनी देखील उपस्थिति दर्शवली.
सर्व उपस्थितांचे देशपांडे कॅटरर्सच्या वतीने संतोष देशपांडे ,कविता देशपांडे आणि समीर देशपांडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*