Home ठळक बातम्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ‘त्या टिकेला’ दिपेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्यूत्तर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ‘त्या टिकेला’ दिपेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्यूत्तर

 

डोंबिवली दि. १९ सप्टेंबर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या टिकेला शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनीही खरमरीत शब्दांत प्रत्यूत्तर दिलेले पाहायला मिळाले. रविंद्र चव्हाण हे कॅबिनेट मंत्री आहेत, हेच ते विसरले असून 13 वर्षांपासून डोंबिवलीतील अनेक विकास कामे रवींद्र चव्हाण यांच्यामुळे रखडल्याचा प्रत्यारोप माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी एका शाळेच्या कार्यक्रमादरम्यान कल्याण शीळ रस्त्याचे काम, डोंबिवलीतील रस्त्यांची कामांवरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह राज्यातील राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तर या पार्श्वभुमीवर शिंदे गटातील माझी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. रवींद्र चव्हाण हे ज्या चारशे कोटींचा उल्लेख करतात ते कधी मंजूर झालेच नव्हते, तर ३७० कोटीची कामे मंजूर झाली ते कुणी सांगत नाही. रवींद्र चव्हाण हे गुवाहाटीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना याबाबत सांगायला पाहिजे होते असे दिपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच गेल्या तेरा वर्षात रविंद्र चव्हाण यांच्याकडून डोंबिवलीमध्ये काही कामे झाली नाहीत. तर डोंबिवलीतील दोन रस्ते त्यांच्या खात्याच्या अखत्यारित येत असून ते मंत्री होऊन दिड महिना झाला. परंतु अद्यापही त्या दोन रस्त्यांचे काम सुरू झालेली नसल्याचे सांगत चव्हाण हे आपले पाप लपवण्यासाठी असे आरोप करत असल्याची टीका दिपेश म्हात्रे यांनी यावेळी केली.

नेमके काय म्हणाले होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण..??
एकीकडे एका दिवसात 28 किलोमीटर रस्ता तयार होतो दुसरीकडे आठ वर्षापासून कल्याण शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी कोण जबाबदार आहे . एवढेच नाही तर डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांसाठी 472 कोटी निधी मंजूर करण्यात आला होती. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, ते थांबवण्यात आले, आता निधी परत मंजूर करण्यात यावा आणि केलेले पाप धूऊन टाका अशा तिखट शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी टिका केली होती.

दरम्यान राज्याच्या मंत्री मंडळातील एक प्रमूख मंत्री असणाऱ्या रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या या टिकेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागील लेखशासन सेवेत कायम करण्याच्या निर्णयात कोरोना काळातील वीज कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्या
पुढील लेख‘डोंबिवलीच्या बजबजपुरीला आमदार रविंद्र चव्हाण हेच जबाबदार’ ; डोंबिवली शिवसेनेचाही हल्लाबोल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा