Home ठळक बातम्या दिव्यातील डम्पिंगचा प्रश्न वर्षभरात सोडवणार – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

दिव्यातील डम्पिंगचा प्रश्न वर्षभरात सोडवणार – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

 

दिवा दि.13 एप्रिल :
दिव्यातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न पुढच्या वर्षभरात सोडवू असे प्रतिपादन कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. दिवा परिसरात काढण्यात आलेल्या प्रचाररॅली दरम्यान लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं आज दिवा आणि ग्रामीण परिसरात प्रचाररॅली काढली. या रॅलीतून सेनेनं ग्रामीण भागात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. दिव्याच्या साबे गावापासून दिवा शहर, मुंब्रादेवी कॉलनी, दातिवलीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी दिवावासीय हजारोंच्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते म्हणाले की दिव्याची बकाल अवस्था दूर करण्याचा आपण गेल्या 5 वर्षांत प्रयत्न केला असून दिवावासीयांना पक्के रस्ते दिल्याचं डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. तसंच पुढच्या वर्षभरात दिवा डम्पिंगचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*