Home कोरोना मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका आणि पोलिसांच्या पथकावर सोडले कुत्रे

मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका आणि पोलिसांच्या पथकावर सोडले कुत्रे

डोंबिवली दि.28 एप्रिल :
मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस आणि पालिकेच्या पथकावर कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल करत 2 जणांना अटक केली आहे. (Dogs left on a municipal and police squad that went to take action against unmasked individuals)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू आहे. मात्र अशाच एका कारवाई दरम्यान पोलिसांवर चक्क कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात घडला. खंबाळ पाडा मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. यादरम्यान एका गॅरेजबाहेर तिघे जण विनामास्क आढळून आले. पोलीस आणि पालिकेचे पथक या तिघांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना तिघांनी आधी पोलिसांशी हुज्जत घातली. इतक्यावरच न थांबता त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्यांपैकी एक कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तायडे यांच्या पायाला दुखापत झाली.
तर याप्रकरणी डोंबिबली पोलीस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी जे.डी. मोरे यांनी दिली.

मागील लेखभारतीय जनता युवा मोर्चा, व्योम संस्था आणि भारत विकास परिषद आयोजित ‘प्लाझ्मादान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 91 रुग्ण तर 1 हजार 470 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा