Site icon LNN

डोंबिवली हा युतीचा, हिंदुत्वाचा बालेकिल्ला, युतीमध्ये कोणी खडा टाकू नये – खासदार डॉ श्रीकांत शिंदे

जे मराठीच्या नावाने एकत्र आले त्यांनी मराठी माणसांसाठी काय केले?

डोंबिवली दि.26 डिसेंबर :
डोंबिवली हा सुरुवातीपासूनच महायुतीचा , हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिला असून कोणीही त्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये अशा शब्दांत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी महायुतीविरोधात वक्तव्ये करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. डोंबिवली पश्चिमेच्या सम्राट चौकात झालेल्या विजय निर्धार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विकासकामांची जंत्री वाचून दाखवण्यासह विरोधकांचा समाचार घेतला. (“Dombivli Is the Stronghold of the Alliance’s Hindutva; No One Should Create Obstacles in the Alliance” – MP Dr. Shrikant Shinde)

आपल्या लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांत विकासाची जितकी कामे झाली तितकी कोणत्याही मतदारसंघात झाली नाही. आपण नेहमीच विकासाचे राजकारण केले, आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही टीकेला उत्तर दिले नाही. मात्र काही लोकांच्या डोळ्यांवर पट्टी असल्याने त्यांना विकासकामे दिसत नसल्याचा टोला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला. तर काही लोकं मराठी मराठी बोलून एकत्र आले आहेत त्यांनी मराठी माणसासाठी काय केले असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मतदारसंघात विकासाची अक्षरशः गंगा अवतरली. मेट्रो मार्ग, रिंग रोड, रस्ते, उड्डाणपूल, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पाण्याच्या योजना, क्लस्टर योजना, रुग्णालये अशी अनेक कामे आपल्या मतदारसंघात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तर डोंबिवली हा सुरुवातीपासूनच महायुतीचा हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिला आहे. आम्ही कधीही युती सोडून बोललो नाही, आम्ही नेहमी महायुतीबाबतच बोलत आहोत, त्यामुळे या महायुतीमध्ये खडा टाकण्याचे काम करू नये असे सांगत त्यांनी शिवसेना भाजप युतीविरोधात कार्यरत असलेल्या लोकांना सुनावले.

Exit mobile version