Site icon LNN

जागतिक व्यासपीठावर डोंबिवलीचा ठसा; डायबेटिसवरील परिषदेमध्ये डॉ.महेश पाटील यांचे मधुमेह नियंत्रणावर मार्गदर्शन

डॉ. पाटील यांच्या फ्रेमवर्कचे परिषदेत विशेष कौतुक

डोंबिवली दि.16 फेब्रुवारी :
डोंबिवली येथील आर्युवेदिक मधुमेह तज्ज्ञ आणि डायबेटीस रिव्हर्सल कोच डॉ. महेश पाटील यांनी अलीकडेच Diabetes India 2026 – World Congress of Diabetes & Obesity या राष्ट्रीय परिषदेत आपले संशोधनपत्र सादर करून शहराचा मान उंचावला आहे. हैदराबाद येथील HICC (Hyderabad International Convention Centre) येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान झालेल्या या परिषदेत देश-विदेशातील नामांकित तज्ज्ञ सहभागी झाले होते. (Dombivli Makes Its Mark on the Global Stage; Dr. Mahesh Patil Shares Insights on Diabetes Control at International Conference)

“Diabetes 360° : Bridging Science & Sustainability” या मुख्य संकल्पनेवरील परिषदेत जीवनशैली-आधारित मधुमेह नियंत्रण या विषयावर डॉ. महेश पाटील यांनी आपले निष्कर्ष मांडले.

डॉ. पाटील यांनी आपल्या सादरीकरणात संतुलित आहार, नियोजित उपवास पद्धती, नियमित व्यायाम, ताण-नियंत्रण आणि शिस्तबद्ध दिनचर्या यांच्या साहाय्याने HbA1c मध्ये लक्षणीय घट साध्य करता येते, हे प्रत्यक्ष अनुभव व आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केले. औषधांवर पूर्ण अवलंबित्व न ठेवता योग्य मार्गदर्शनाखाली मधुमेह नियंत्रण शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या परिषदेत डॉ. व्ही. मोहन, डॉ. अनुप मिश्रा, डॉ. शशांक जोशी, डॉ. एस.आर. अरविंद आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह तज्ज्ञ उपस्थित होते. International Diabetes Federation, EASD, PCDE आणि International Atherosclerosis Society यांसारख्या जागतिक संस्थांच्या संयुक्त सत्रांमुळे परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारतीय रुग्णांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास करून तयार केलेल्या या फ्रेमवर्कचे परिषदेत विशेष कौतुक करण्यात आले. मधुमेह व्यवस्थापनात “रुग्ण सक्षमीकरण” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

डोंबिवलीसह परिसरातील रुग्णांसाठी हे अभिमानाचे व प्रेरणादायी पाऊल मानले जात असून, स्थानिक पातळीवर जीवनशैली-आधारित आरोग्य चळवळ अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version