Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या ग्रामीण भागात महिला बचतगटांचा महामेळावा ; 10 हजार महिलांची उपस्थिती

डोंबिवलीच्या ग्रामीण भागात महिला बचतगटांचा महामेळावा ; 10 हजार महिलांची उपस्थिती

डोंबिवली दि.6 फेेेब्रूवारी :

शहराला लागून मोठा ग्रामीण भाग आहे. याच ग्रामीण भागात बचतगटाच्या महिलांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला तब्बल 10 हजार महिला उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील उद्योगांना राज्यात आणि परदेशात देखील मोठी मागणी आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबाजी पाटील यांनी  महिलांचे बचत गट एकत्र करून व महिलांना संघटती करून त्यांना कशा पध्दतीने चांगला उद्योग आपण करू शकतो यांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांना कुकुट पालन , दूध उद्योग ,कोंबडी पालन ,कडकनात कोंबडी पालन ,गृह उद्योग ,हस्त कला यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योग गुरु ट्रेडिंग व कन्स्लटंटचे सर्वेसर्वा इरफान कौचाली यांनी महिलांना मार्गदर्शन केले .यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी भगीरत भोईर ,डोंबिवली शाखा व्यवस्थापक बालाजी पाटील, बी .के. फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी पाटील,ऍड सुवर्णा पावशे ,आकाश पाटील ,शुभम पाटील उपस्थित होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बीके फाऊंडेशन यांच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*