खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिपसंध्येचे आयोजन
डोंबिवली दि. 22 ऑक्टोबर :
डोंबिवलीकरांची उद्याची म्हणजेच रविवारची सायंकाळ सुरांच्या साथीत न्हाऊन निघणार आहे. दिवाळीचे औचित्य साधुन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे दिपसंध्या या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि गायक स्वप्निल यांच्या सुमधुर आवाजात डोंबिवलीकरांची उद्याची सायंकाळ चांगलीच सूरमयी ठरणार आहे.
डोंबिवलीतील सांस्कृतिक कार्यक्रमांचा केंद्रबिंदू असणाऱ्या फडके रोडवरील अप्पा दातार चौकात उद्या 23 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला डोंबिवलीकर रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.