Home ठळक बातम्या मुंबई पूल अपघातात डोंबिवलीतील 3 महिलांचा मृत्यू ; डोंबिवलीवर शोककळा

मुंबई पूल अपघातात डोंबिवलीतील 3 महिलांचा मृत्यू ; डोंबिवलीवर शोककळा

 

डोंबिवली दि.15 मार्च :
गुरुवारी संध्याकाळी मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीतील तीन महिलांना आपला जीव गमवावा लागला असून त्यामूळे डोंबिवली शहरावर शोककळा पसरली आहे.

अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी या तिघींची नावं असून त्या तिघीही जीटी रुग्णालयात नर्स होत्या. डोंबिवली पश्चिमेला राहणाऱ्या या तिघी आज संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरून निघाल्या आणि मध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सीएसएमटी स्थानकाबाहेरचा पूल कोसळला आणि त्यात या तिघींचाही मृत्यू झाला. या घटनेनं या तिघी राहात असलेल्या परिसरावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*