Site icon LNN

डोंबिवलीची गोल्डनगर्ल : श्रीलंकेतील जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तब्बल 5 सुवर्ण पदकांची कमाई

डोंबिवली दि.4 डिसेंबर :
डोंबिवलीकर कुमारी सृष्टी प्रवीण पाटीलने श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तब्बल ५ सुवर्ण पदकांची कमाई करत डोंबिवलीची मान अभिमानाने उंचावली आहे. सामान्य कुटुंबातून आलेली सृष्टी तिच्या आई-वडिलांच्या मेहनतीने आणि स्वतःच्या जिद्दीने या यशापर्यंत पोहोचली असून तिच्या या पाचही जागतिक सुवर्ण पदकांमुळे मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. (Dombivli’s Golden Girl: Shines with 5 Gold Medals at the World Powerlifting Championship in Sri Lanka)

सृष्टीने मिळविलेले विजेतेपद :

वर्ल्ड चॅम्पियन 2025 – Under 48kg Overall
वर्ल्ड चॅम्पियन – Under 48kg Junior Bench Press
वर्ल्ड चॅम्पियन – Under 48kg Open Bench Press
वर्ल्ड चॅम्पियन – Under 48kg Open Deadlift
वर्ल्ड चॅम्पियन – Under 48kg Junior Deadlift

डोंबिवली पूर्व पाथर्ली गावातील साध्या कुटुंबातील सृष्टीने कठोर परिश्रमातून ही गोल्डन ट्रॉफी जिंकली. तिच्या आई–वडिलांनीही तिच्यासाठी केलेल्या त्याग आणि संघर्षातून तिने हे सुवर्ण यश पटकावले.


सृष्टीच्या या चमकदार सुवर्ण कामगिरीनिमित्त शिवसेना डोंबिवली शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणचे आमदार मा. राजेश मोरे यांच्या उपस्थितीत कुमारी सृष्टीचा सत्कार करण्यात आला. याआधीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सृष्टीला विशेष शुभेच्छा दिल्या होत्या.

या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सचिव संतोष चव्हाण,विभाग प्रमुख अमोल पाटील तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

डोंबिवलीच्या या सुवर्णकन्येच्या चमकदार जागतिक कामगिरीमुळे शहरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात असून सृष्टीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version