Home ठळक बातम्या लोकलच्या गर्दीमुळे डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू

लोकलच्या गर्दीमुळे डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू

 

डोंबिवली दि.6 फेब्रुवारी :

दोन दिवसांपूर्वी कोपर रेल्वे स्टेशनजवळ रूळ ओलांडताना असतानाच चिमुरड्यासह दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा कोपर रेल्वे स्टेशन इथे लोकलमधील गर्दीने तोल सुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच आता नितेंद्रच्या मृत्यूने पुन्हा एकदा डोंबिवली हळहळली आहे.

नितेंद्र विरेंद्र यादव असं या तरुणाचं नाव असून तो डोंबिवलीतल्या गोग्रासवाडी इथे रहाणारा आहे. नितेंद्र एका खासगी कंपनीत कामाला होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्टेशनमधल्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने नितेंद्रला आत शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्यात लटकून त्याला प्रवास करावा लागला आणि तिथेच घात झाला. डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडल्याने नितेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच, नितेंद्रच्या मृत्यूने पुन्हा डोंबिवली हळहळली आहे. गर्दीने भरलेली लोकल स्थानकात येताच जो-तो जिवाच्या आकांताने लोकलमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करतो. या नादात अनेक जण जखमी होतात, तर काहींचे जीवही जातात. हे चित्र सर्वत्र पहायला मिळतंय. त्याला डोंबिवली सारख्या प्रवाशांनी खचाखच भरलेलं शहर देखील अपवाद नसल्याचं वाढत्या अपघातांच्या घटनांवरून स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*