Home कोरोना कोवीड रुग्ण वाढत असले तरी घाबरून जाऊ नका – केडीएमसी आयुक्तांचे नागरिकांना...

कोवीड रुग्ण वाढत असले तरी घाबरून जाऊ नका – केडीएमसी आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

 

टास्क फोर्सचे डॉक्टर्स, स्त्रीरोग, बालरोग तज्ञांची झाली बैठक

कल्याण – डोंबिवली दि.7 जानेवारी :
कोविड सदृश्य लक्षणे दिसल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता चाचणी करुन घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अधिपत्याखाली,महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांसमवेत (हॉस्पिटल चालक, स्त्री रोगतज्ञ, बालरोगतज्ञ) कोविडचा गरोदर स्त्रिया आणि लहान मुले यावर होणारा परिणाम आणि त्याबाबत करावयाच्या उपाय योजनासंदर्भात दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.

सध्या कोविड बाधितांमध्ये गरोदर महिला आणि लहान मुलांचे प्रमाण जास्त आढळून येत असले तरी त्यांनी घाबरुन न जाता उपचार करून घ्यावेत. लहान मुले कोविड बाधित झाली तरी त्यांचे घराबाहेर विलगीकरण करण्याची आवश्यकता नाही. घरातच विलगीकरण करुन त्यांच्यावर कोविड प्रोटोकॉलनुसार उपचार करुन घ्यावेत, असेही ते पुढे म्हणाले. सध्याचा कोविडच्या ट्रेन्ड हा सौम्य असून घरात विलगीकरणात राहूनही योग्य उपचाराअंती
रूग्ण बरा होवू शकतो, तरी नागरिकांनी घाबरून न जाता आपले लसीकरण बाकी असल्यास त्यांनी आपले कोविड लसीकरण करुन घ्यावे. त्याचप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुलांनी देखील कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयातील फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडीट आणि इलेक्ट्रिक ऑडिटची पूर्तता करून घ्यावी आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवावा तसेच रुग्णालयातील बेड मॅनेजमेंट सिस्टीम अद्ययावत ठेवावी. जेणेकरून कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास होण्यास अडचण भासणार नाही असे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी केले.

या बैठकीला आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयएमए डोंबिवलीच्या अध्यक्षा डॉ. भक्ती लोटे, आयएमए डोंबिवलीच्या सेक्रेटरी डॉ. निती उपासनी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.अमित कामत, बालरोग तज्ञ डॉ. अनंत इटकर, डॉ. गिरीश भिरुड, डॉ. सोनाली पाटील तसेच आरोग्य विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.पानपाटील, शास्त्रीनगर रूग्णालयाच्या डॉ. बडेकर हे डॉक्टर्स प्रत्यक्ष उपस्थित होते तसेच इतर 70 डॉक्टर्स दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 172 रुग्ण तर 30 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 20 रुग्ण तर 32 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा