सचिवपदी हिमांशु ठक्कर तर खजिनदारपदी डॉ. स्वाती शेलार
कल्याण | 2 मे :
खासगी डॉक्टरांची संस्था असूनही कल्याणच्या सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या इंडीयन मेडीकल असोसिएशन ऑफ कल्याणच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. त्यामध्ये या संघटनेचे 46 वे अध्यक्ष म्हणून कल्याणातील सुप्रसिद्ध ऑर्थोतज्ज्ञ डॉ. राजेश राघव राजू यांनी तर सचिवपदी डॉ. हिमांशु ठक्कर आणि खजिनदारपदी डॉ. स्वाती शेलार यांनी पदभार स्विकारला. (Dr. Rajesh Raghav Raju Elected as President of Indian Medical Association, Kalyan)
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, ख्यातनाम ऑर्थोपीडिक सर्जन आणि मुंबई ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गौतम जव्हेरी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कल्याणातील आयएमए हॉलमध्ये हा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
आपत्ती काळातील आरोग्य सेवेच्या मार्गदर्शनाची गरज – आयुक्त अभिनव गोयल
वाढत्या नैसर्गिक आपत्ती-अपघाताच्या घटना पाहता इंडियन मेडीकल असोसिएशनने महापालिकेच्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपत्ती काळातील आरोग्यसेवेच्या मानक कार्यप्रक्रियेबाबत (SOP) मार्गदर्शन करण्याची गरज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केली.
एआय केवळ आजारावर उपचार करतं- डॉ. गौतम जव्हेरी..
वाढत्या एआयच्या प्रभावाचा धागा पकडत ऑर्थोसर्जन डॉ. गौतम जव्हेरी यांनी सांगितले की एआय आले तरी डॉक्टरांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. कारण एआय हे तंत्रज्ञान केवळ आजारावर – रोगावर इलाज करतं, तर डॉक्टर हे रुग्णाला समजून घेऊन त्याच्यावर उपचार करत असल्याचा फरक डॉ. जव्हेरी यांनी समजावून सांगितला.
कल्याणकारांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित करणार – डॉ. राजेश राघव राजू
तर आयएमए कल्याण शाखेला सामाजिक कार्याची एक मोठी परंपरा लाभली असून त्यामूळे आज या संस्थेने प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे. येत्या काळामध्ये कल्याणातील नागरिकांसाठी सर्व सुपर स्पेशालिटी आणि नामांकित हॉस्पिटलच्या सहाय्याने महाआरोग्य शिबिर घेण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी बोलून दाखवला. यावेळी कल्याण शहरातील विविध वैद्यकीय तसेच सामाजिक, संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि कल्याणातील प्रतिष्ठीत नागरिकांकडून डॉ. राजेश राघव राजू यांना अध्यक्षपदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आयएमए कल्याणच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, उद्यान अधीक्षक संजय जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*आयएमए कल्याणची नविन कार्यकारिणी…*
अध्यक्ष – डॉ. राजेश राघव राजू
सचिव – डॉ. हिमांशु ठक्कर
खजिनदार – डॉ. स्वाती शेलार,
*प्रेसिडेंट इलेक्ट*
डॉ. विकास सुरांजे
*जॉइंट सेक्रेटरी*
डॉ. अमित धर्माधिकारी
*ट्रस्टी*
* डॉ. नरेंद्र पाठक
* डॉ. प्रदीपकुमार सांगले
* डॉ. राजन माने
*व्यवस्थापकीय समिती*
* डॉ. कविता तोडकर
* डॉ. कुलदीपक जे. शिंदे
* डॉ. लीना सानेकर
* डॉ. मनोज पाटील
* डॉ. राहुल जी. तिवारी
* डॉ. रुपाली धोपटे
*स्टेट कौन्सिल मेंबर्स*
* डॉ. अमित बोटकोंडे
* डॉ. गणेश शिरसाठ
* डॉ. प्रशांत सी. खाताळे
* डॉ. प्रशांत पी. पाटील
* डॉ. शशांक डी. पाटील
*सेंट्रल कौन्सिल मेंबर्स*
* डॉ. दीपक राठोड
* डॉ. प्रविण भुजबळ
* डॉ. प्रदीपकुमार सांगले
* डॉ. राजन माने
* डॉ. विवेक भोसले
*वेब बुलेटिन एडिटर्स*
* डॉ. अमित झोपे
* डॉ. प्रतीक्षा एस. रासाळ

