Home Uncategorised “स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा” म्हणजे टेनिस क्रिकेटची पंढरी – द्वारकानाथ संझगिरी

“स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा” म्हणजे टेनिस क्रिकेटची पंढरी – द्वारकानाथ संझगिरी

डोंबिवली दि.3 फेब्रुवारी :
डोंबिवलीत गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित होणारी ‘स्वर्गीय रतनबुवा पाटील  क्रिकेट स्पर्धा’ ही टेनिस क्रिकेटची पंढरी ठरत असल्याचे गौरवोद्गार सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांनी काढले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते.

डोंबिवलीने आजपर्यंत देशाला अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. त्यामूळे या स्पर्धेतूनही येत्या काळात एखादा उदयोन्मुख खेळाडू निश्चितच पुढे येईल. नवे खेळाडू घडवण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्वाच्या असून ही स्पर्धा निश्चितपणे टेनिस क्रिकेटची पंढरी असल्याचे मत संझगिरी यांनी व्यक्त केले.

शहरी आणि ग्रामीण अशा दोन गटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल 86 संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत उत्कृष्टरित्या आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटु दिलीप वेंगसरकर, प्रसिद्ध क्रिकेटपटु अजय जडेजा, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेवक मल्लेश शेट्टी, मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, काॅंग्रेस जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोपिनाथ भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
तर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माजी आमदार रमेश पाटील, मनसे नेते राजु पाटील, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोशिएशन अध्यक्ष विनोद पाटील, विजय पाटील आणि जय दुर्गामाता क्रिकेट संघ,काटई यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

स्पर्धेतील विजेत्या संघांची नावे…

 • प्रथम पारितोषिक (ग्रामीण) – ३,७५,०००/- रुपये व चषक :-  विजयी संघ *सोनारपाडा संघ*
 • द्वितीय पारितोषिक  (ग्रामीण) २,७५,०००/- रुपये व चषक :- उपविजेता संघ  *नवापाडा संघ*    
 • तृतीय पारितोषिक  (ग्रामीण)  १,७५,०००/- रुपये व चषक :- *वाकळण संघ*
 • चतुर्थ पारितोषिक (ग्रामीण) १,७५,०००/- रुपये व चषक :-  *खार्डी संघ*

————

 • प्रथम पारितोषिक (शहरी) ३,३३,३३३/-रुपये व चषक- *भार्गव इलेव्हन*
 • द्वितीय पारितोषिक    (शहरी ) १,७७,७७७/-  व चषक – *जय अंबिका तोंन्द्रे संघ*
   
 • तृतीय पारितोषिक (शहरी ) १,११,१११/- रुपये व चषक – *श्रेयस इलेव्हन संघ*

————

*कल्याण रायगड गट * 

 •  प्रथम पारितोषिक (ग्रामीण ) १,११,१११/-रुपये व चषक – *धानसर संघ*
 •  द्वितीय पारितोषिक (ग्रामीण ) ५५,५५५ रुपये व चषक – *घोट संघ*

—————

 •  स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज – *बाळा बोराडे(नवापाडा)*
 • उत्कृष्ट फलंदाज – *रुपेश (नवापाडा)*
 • उत्कृष्ट श्रेत्ररक्षक – *रवि अलिमकर ( खर्डी)* (यांना प्रत्येकी एक होंडा ऍक्टिव्हा देण्यात आली.)
 • मॅन ऑफ दि सिरीज (ग्रामीण )- रेनॉल्ट क्विड कार व चषक (ग्रामीण) – जीत भोईर (वाकळण)*
 • *मॅन ऑफ दि सिरीज (शहरी) – LCD टिव्ही- आकाश तारेकर

—————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*