Home क्राइम वॉच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात गाडीमध्ये सापडली 3 लाखांची रोकड*

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात गाडीमध्ये सापडली 3 लाखांची रोकड*

 

कल्याण दि.5 एप्रिल :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या वाहन तपासणीमध्ये आज आचारसंहिता पथकाने 3 लाखांची रोकड पकडली. आचार संहिता पथक प्रमुख संजय पोखरकर यांनी कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असणाऱ्या पौर्णिमा पोलीस चौकीजवळ एका व्यापाऱ्याच्या ह्युंदाई क्रेटा गाडीतून ही रोकड हस्तगत केली.

मुरबाड रोडवरील पौर्णिमा पोलीस चौकी परिसरात वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी आचारसंहिता पथकाने तपासणीसाठी ही गाडी थांबवली होती. त्यात या गाडीमध्ये तब्बल 3 लाखांची रोकड आढळली. ज्यामध्ये 500 रुपयांच्या 500 नोटा, 100 रुपयांच्या 400 नोटा आणि 50 रुपयांच्या 200 नोटा आहेत. याबाबत आचारसंहिता पथकाने संबंधित व्यापाऱ्याकडे विचारणा केली. मात्र त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने तसेच रकमेबाबत पुरावा न दिल्याने ही रक्कम महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

*#LoksabhaElection2019*
*#LocalNewsNetwork*
*#LNN*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*