Home ठळक बातम्या प्रस्तावित पुनर्रचना-खासगीकरण बिलाविरोधात राज्यातील वीज अधिकारी-कर्मचारी 3 दिवसांच्या लाक्षणिक संपावर

प्रस्तावित पुनर्रचना-खासगीकरण बिलाविरोधात राज्यातील वीज अधिकारी-कर्मचारी 3 दिवसांच्या लाक्षणिक संपावर

कल्याण दि.28 डिसेंबर :
सरकारच्या प्रस्तावित नव्या धोरणाना वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असून त्याविरोधात 3 दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा संयुक्त कृती समितीने दिला आहे. याविरोधात कल्याणच्या तेजश्री कार्यालयात संयुक्त कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

येत्या 1 जानेवारीपासून केंद्र सरकार इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2018 ची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यामधील प्रस्तावित तरतूदी या जाचक असून त्यामूळे ग्राहकांना चांगली सेवा देण्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचे संयुक्त कृती समितीचे म्हणणे आहे. तसेच या नियमावलीमध्ये पुनर्रचनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जाणार असून ही नियमावली म्हणजे खासगीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचा आरोपही संयुक्त कृती समितीने केला आहे.

त्यामूळे आधीची मंजूर पदे कमी न करता ही नियमावली लागू करावी, पदोन्नतीचे बंद झालेले मार्ग खुले करावे, ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा देण्यासाठी उप विभागांची संख्या वाढवावी, महावितरण कंपनीचे खासगीकरणाचे धोरण थांबवावे आदी महत्वाच्या मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडणार आहे.

तर येत्या 7 जानेवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात येणार असून त्यानंतर आमच्या मागण्यांचा सरकारने विचार न केल्यास 8 आणि 9 जानेवारी रोजीही कामबंद आंदोलन करण्यात इशारा असल्याची माहिती संयुक्त कृती समितीच्या श्रीनिवास बोबडे (इंजिनिअर संघटना) आणि कृष्णा भोयर (federation)यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*