Home क्राइम वॉच महावितरणकडून २४ लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश ; ३९ जणांविरोधात गुन्हे दाखल

महावितरणकडून २४ लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश ; ३९ जणांविरोधात गुन्हे दाखल

कल्याण दि. १० ऑक्टोबर :
महावितरणने टिटवाळा उपविभागाच्या मांडा आणि गोवेली परिसरात वीज चोरांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या ३९ जणांविरोधात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याकडून २४ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यातही यश आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून आणि वीज मीटर टाळून परस्पर वीजचोरी केल्याचे महावितरणच्या कारवाईत आढळून आले आहे. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन आणि कनिष्ठ अभियंता धनंजय पाटील त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

मागील लेखकेडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई
पुढील लेखतब्बल 5 हजार टीबी रुग्ण केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी घेतले दत्तक

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा