Home ठळक बातम्या गाजर वाटप न करता केलेली चांगली कामे लोकांसमोर न्या – भाजपचे नाव...

गाजर वाटप न करता केलेली चांगली कामे लोकांसमोर न्या – भाजपचे नाव न घेता आदित्य ठाकरेंचा टोला

कल्याण दि.25 जानेवारी :
निवडणुका येत असतात आणि जात असतात. मात्र राजकारण बाजूला ठेऊन काम करणे गरजेचे आहे. गाजर वाटप न करता चांगली कामे लोकांसमोर नेण्याचा नविन पायंडा पाडण्याची गरज पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. कल्याणच्या स्टेशन एरियातील सॅटीस (स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम) प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भाजपचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी भाजप खासदारांच्या उपस्थितीत हा टोला लगावला.

निवडणुकीनंतर कोणाची ना कोणाची तरी सत्ता येते,जाते. परंतु आपण दिलेली विकासकामांची वचने पूर्ण होणे गरजेचे असते. 5-6 वर्षांपूर्वी साडेसहा हजार कोटींचे वचन देण्यात आले होते. पण ठीक आहे ते निघून गेले असून आगामी निवडणुकीत गाजर वाटप न करता केवळ केलेली चांगली कामे लोकांसमोर नेण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनप्रमाणे को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन संकल्पना कल्याणात राबवण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान सॅटीसच्या या भूमिपूजन कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी भाषणात केलेल्या साडेसहा हजार कोटी आणि गाजर वाटप या वक्तव्याचीच खमंग चर्चा सुरू होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा