Home ठळक बातम्या उंबार्ली टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचं आंदोलन

उंबार्ली टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचं आंदोलन

 

डोंबिवली दि.5 जानेवारी:

डोंबिवलीचा श्वास ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली गावातील टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आज सकाळी आंदोलन केले. या आंदोलनात लहान मुले, महिलावर्ग तसेच जेष्ठ नागरिकसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी अंदोलनकर्त्याची भेट घेत म्हाडा आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उंबर्ली टेकडीवरील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार राजू पाटील यांनी दिल्या.

डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहरांचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली गावच्या टेकडीवर सुरुंग लावून स्फोट करून बांधकाम होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. सतत डोंगर पोखरून ब्लास्टिंग होत असल्याने अनेक पक्षी या भागातून स्थलांतरित झाले आहेत. तर डोंगराला सतत लागणारे वणव्यामुळे वनसंपदेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या प्रकरणांना कोणत्याही प्रकारचा आळा बसत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी सकाळच्या सुमारास आंदोलनाचे हत्यार उपासले. त्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हाडा , वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त चर्चा करत संबंधित परिसरात पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आंदोलनात पर्यावरणप्रेमी मंगेश कोयंडे, बंडू पाटील, मुकेश पाटील, राजेश कदम, निखिल पाटील, सागर जेधे, जगदीश ठाकूर, महेश निंबाळकर, राजेंद्र नांदोस्कर, निखिल पाटील यांच्यासह अनेक नागरिक आणि लहानमुलेही सहभागी झाले होते.

तर यावेळी म्हाडाचे डेप्युटी इंजिनिअर सुदीप भडांगे, वनविभागाच्या कल्याण विभागीय अधिकारी कल्पना वाघेरे यादेखील उपस्थित होत्या. तर सरकारने म्हाडाच्या गृहसंकुलांच्या प्रकल्पासाठी जागा हि दिलेली असून त्याच जागेत काम सुरु असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इतर जागेत आम्ही कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नसल्याची ग्वाही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरणप्रेमींना दिली आहे. तर पर्यावरणप्रेमींनी देखील आंदोलन मागे घेत लवकरच पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा