Home कोरोना अखेर केडीएमसी क्षेत्रातील निर्बंधही झाले शिथिल; रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास...

अखेर केडीएमसी क्षेत्रातील निर्बंधही झाले शिथिल; रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

कल्याण -डोंबिवली दि.3 ऑगस्ट :
राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार कल्याण डोंबिवलीतील कोवीड निर्बंधही शिथिल करण्यात आले असून दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्याने दुकानदार आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोवीड रुग्ण कमी असूनही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोवीड लेव्हल 3 मध्ये समावेश झालेल्या कल्याण डोंबिवलीतील दुकानदार आणि व्यापारी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. (eventually-the-covid restrictions-in-the-kdmc-sector-were-also-relaxed-shops-allowed-to-continue-until-10-p-m)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच कोवीड रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती. त्यानूसार आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीचा आढावा घेत निर्बंध शिथिल झाल्याचे आदेश जारी केले. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानेही मग जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या आदेशानुसार केडीएमसी क्षेत्रासाठीचे आदेश काढले. आजपासून म्हणजेच 3 ऑगस्टपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असून असून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार आहेत.

आजच्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर विशेष बाब म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर शॉपिंग मॉल्स आणि मल्टीप्लेक्स मात्र पूर्णतः बंदच राहणार असून रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील आणि रविवारी पूर्ण वेळ बंद राहतील. तर संध्याकाळी 4 नंतर हॉटेल- रेस्टॉरंटला पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यानूसार राज्य सरकारने निर्बंध शिथिल करत आगामी सण-उत्सवांच्या तोंडावर व्यापारी आणि दुकानदार वर्गाला मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.

असे आहेत नविन नियम…

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 10 पर्यंत सुरू राहतील,#LNN

अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद राहतील,

शॉपिंग मॉल्स पूर्णतः बंद राहतील,

रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, रविवारी पूर्ण वेळ बंद राहतील, या दरम्यान पार्सल सेवा सुरू राहील,#LNN

रेस्टॉरंट्स आणि हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील,

व्यायाम शाळा, योगा क्लास, सलुन, ब्युटी पार्लर आणि स्पा 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शनिवार रात्री 10 पर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद राहतील,

सार्वजनिक मैदाने आणि उद्याने केवळ व्यायाम, चालणे, धावणे, आणि सायकलिंगसाठी सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील,

धार्मिक स्थळे अजूनही बंदच राहतील,#LNN

चित्रीकरण हे दिलेल्या वेळेनुसार सुरू राहील,

उपनगरीय लोकल बाबत मुंबई महानगरपालिकेने दिलेले आदेश लागू राहतील, म्हणजेच लोकल प्रवेश बंद राहील,

लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल,

सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू राहील मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही,#LNN

सर्व सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स बंदच राहतील,

सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालय 100% क्षमतेने सुरू राहतील,#LNN

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा